Home Top News रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली!शिवसेनेच्या माजी आमदाराचं निधन

रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली!शिवसेनेच्या माजी आमदाराचं निधन

0

डोंबिवली – शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झालं. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्यानं त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. देसाई यांच्यावर डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेंटिलेटर नसल्यानं रुग्णलयानं देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली. यानंतर रुग्णवाहिका ढकलण्याची वेळ देसाई कुटुंबीयांवर आली.

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील एका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. त्यानंतर देसाई कुटुंबियांनी मंजुनाथ शाळेपर्यंत रुग्णवाहिका ढकलत न्यावी लागली. या पार्श्वभूमीवर देसाई यांचा मुलगा ऋषिकेश यानं साई पूजा रुग्णवाहिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचं सांगितलं. माजी आमदार देसाई हे सन १९९५ ते २००० या काळात परळ-लालबाग विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेली 23 वर्ष देसाई हे डोंबिवली पश्चिम येथील भागशाला मैदान या भागात वास्तव्यास होते.

Exit mobile version