Home Top News साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची मोठी कारवाई;प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची मोठी कारवाई;प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

0

सिंधुदुर्गः दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर ईडीने प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक केली आहे.त्यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका. ठेवण्यात आला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळखळ उडाली आहे.

जयराम देशपांडे हे दापोलीतील प्रांताधिकारी आहेत. ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष बाब म्हणजे अगदी चार दिवसांपूर्वीच उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत तसेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याचं बोललं गेलं. सभा पार पडून आठवडा उलटत नाही तोच संजय कदम यांना ईडीने बेड्या ठोकल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

दरम्यान, सदानंद कदम यांच्यानंतर आता ईडीने या प्रकरणात प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना सुद्धा ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या कारवाईनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

किरीट सोमय्या सगळ्यांना उद्धवस्त करण्यासाठीच बसले आहेत. साई रिसॉर्टशी माझा राजकीय संबंध जोडून मला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तो राजकीय खेळीचा भाग आहे. पण अन्य ज्यांची काही घरं आहेत, काही लोकांची छोटी छोटी स्टक्चर आहेत. तीही यात उध्वस्त होती, यांची जबाबदारी किरीट सोमय्या घेणार का? असा सवाल करत ते म्हणाले की, याला सरकार आणि सोमय्यांना जबाबदार धरलं जाईल असंही अनिल परब म्हणाले होते.

Exit mobile version