Home Top News प्रशिक्षू विमानाच्या अपघातस्थळी पोचले तपासणी पथक,मात्र ब्लक बाक्स सापडेना

प्रशिक्षू विमानाच्या अपघातस्थळी पोचले तपासणी पथक,मात्र ब्लक बाक्स सापडेना

0

गोंदिया,दि.20ः शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरच्या भक्कुटोला जंगलात झालेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुंबईहून आलेल्या तीन सदस्यीय तपास पथकाने सोमवारी घटनास्थळी पोहोचून घटनेबाबत पुरावे आणि माहिती गोळा केली आहे.मात्र या पथकाला विमानाचा ब्लक बाँक्स न मिळाल्याने चौकशीकरीता आपल्या ताब्यात घेता आलेला नाही.सदर तीन सदस्यीय तपासणी पथक अजूनही गोंदियात तळ ठोकून आहे.

डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मुंबई यांच्या टीमने मध्यप्रदेशातील भुक्कुटोलाच्या पहाडी भागात 100 फूट खोल पहाडात विखुरलेल्या विमानाच्या अवशेषाची पाहणी केली.तसेच त्या अपघातस्थळावरुन जे  आवश्यक उपकरणे, रीडिंग बॉक्स, कॉकपिटमधील सिग्नल यासारखी काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला असला तरी विमानाचा बहुतांश भाग जळाल्याने तपासणी पथकाला चौकशीकरीता आवश्यक तांत्रिक साहित्याची जुळवाजुळव करताना अडचणी आल्याचे वृत्त आहे.या तपासाचा अहवाल तपासणी पथक मुंबईला परत गेल्यानंतर दिल्ली येथील मुख्यालयाला सादर करणार असल्याने यास किती दिवस लागतील याबाबत नेमका अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक शफिक शाह यांनी सांगितले. तपासणी टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि विमानाच्या उड्डाणाची दिशा, अपघातापूर्वी त्याचा वेग, झाड किंवा खडकावर आदळल्याचा आघात इत्यादींचे मूल्यांकन केले आहे. वाचन बॉक्स, सुरक्षित असल्यास, प्रशिक्षणार्थी विमानाच्या शेवटच्या क्षणी वेगाची माहिती असेल. डेटा रेकॉर्डर जमा केले गेले आहेत.त्यांनी सांगितले की, कागदपत्रे, घटनास्थळी असलेले पुरावे आणि ब्लॅक बॉक्समधील वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक यांच्यातील संभाषणाची सविस्तर तपासणी केल्यानंतरच अपघाताची कारणे स्पष्ट होणार आहेत.

शनिवारी झालेल्या अपघातात महिला प्रशिक्षणार्थी पायलट वृषांका मोहश्वरी, गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी आणि हिमाचल प्रदेशातील प्रशिक्षक पायलट मोहित ठाकूर यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version