Home Top News ‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

0

१५ मे रोजी  ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’!

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द ‘अल्ट्रा झकास’ने पाळला आहे. ‘रौद्र’, ‘कुलस्वामिनी’, ‘इरुल-रात्र अंधारी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘थरार प्रेमाचा-अथिरन’नंतर ‘अदृश्य’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा करत आहेत. १५ मेपासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या चित्रपटातील रहस्य्यांचा उलगडा होणार आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री मंजरी फडणीस, हॅण्डसम हंक पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अदृश्य’ या रोमांचक रहस्यमय चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ‘ताल’, ‘परदेस’, ‘कहो ना प्यार है’, ‘वेल कम बॅक’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांनी सांभाळली आहे. प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या सायलीचा मृत्यू होतो. तर, सायलीची जुळी बहिण असणारी सानिका आपल्या बहिणीच्या मृत्यूमागचं गूढ शोधण्यासाठी प्रयत्न करते. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणार घेऊन येतो.

“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. शिवाय, समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार  सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. अदृश्य रहस्याची उकल करण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

Exit mobile version