मुंबईतील संख्या सर्वाधिक
मुंबई :– मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व औरंगाबादसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष व उत्साह दिसून येत आला. मुंबईतही विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचे थर लावत असताना राज्यात 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबईत सर्वाधिक 77 गोविंदा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
दहीहंडीच्या उत्सवात उंचच्या उंच मनोरे रचणारे गोविंदा आपल्या जिवाची पर्वा न करता दहीहंडी फोडतात. गोविंदाना या सहासी खेळात कोणतीही दुखापत झाल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सोय शासनामार्फत करण्यात आल्या आहे. तसेच सर्व गोविंदांना विमा कवचदेखील देण्यात आले आहे.
तर जल्लोषाच्या वातावरणात दहीहंडी साजरी होत असताना बुलडाणा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
Buldhana जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे ही घटना घडली आहे. दहीहंडीची एका बाजूची दोरी भिंतीमधील गॅलरीला बांधलेली होती. त्या दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले तेव्हा भिंत कोसळली आणि या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निदा रशीद खान पठाण असे मृत मुलीचे नाव आहे तर अल्फिया शेख हफीज ही 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.