‘या’ जिल्ह्याने काढली जाहिरात….आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद

0
8

गोंदिया,दि.29ः जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव, उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पदावर भरती केली जाणार आहे.

तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.तहसीलदार पदासाठी ४० हजार रुपये मानधन तर कारकून पदासाठी २५ हजार रुपये मानधन राहणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आणि विविध नियम दिले आहेत. मात्र, शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.