ओबीसी कार्यकर्ता टोंगेचे उपोषण मागे..

0
9

चंद्रपूर- मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या इतरही मागण्या मान्य केल्या आहेत. ओबीसीसाठी १० लाख घरे देण्याची योजना तयार केली. राज्य सरकारला ओबीसींचे हीत करायचे आहे. अद्यापही सर्व प्रश्न सुटलेले नाही, मात्र हे सरकार फक्त आश्वासन देऊन शांत बसणार नाही. तर दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चंद्रपुरात दिली.
ओबीसींच्या योजनेसाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल प्रवेशात २७ टक्के आरक्षण देऊन संविधानिक दर्जा दिला आहे. शुक्रवारी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत ज्यांना बोलावण्यात आले नाही असे कोणाला वाटत असेल, तर त्यांच्या सोबत देखील राज्य सरकार चर्चा करायला तयार आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की उपोषण सोडले. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले आहे.