२००० हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली

0
5

आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई :-दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे.उद्या रविवारपासून २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी ७ दिवसांची मुदत मिळाली आहे.

२००० हजारांच्या नोटा जमा करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर होती,परंतू ती आता एक आठवड्याने वाढविण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० हजारांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. चलनात असलेल्या ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे सांगितले जात आहे.

आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी उरलेल्या २४ हजार कोटी रुपयांपैकी किती नोटा परत येतात हा एक प्रश्नच आहे. शेवटचा आकडा ७ ऑक्टोबरनंतर समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर उरलेल्या हजारो करोडोंच्या नोटांचा काय झाले हा देखील मोठा प्रश्न यंत्रणांसमोर राहणार आहे.