राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

0
10

मुंबई -राहुल गांधी  यांना राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याचा कॉल नाशिक पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन आला होता. पोलिसांना गेल्या आठवड्यात हा फोन आला होता. तेव्हापासून पोलीस अलर्टवर होते. पोलिसांनी तपास करत आरोपींना शोधून काढलं आहे. यावेळी आरोपी हा एक मनोरुग्ण असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आहे. आरोपीने दारुच्या नशेत संबंधित कृत्य केल्याचं उघड झालं आहे.

तसेच गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचं व्यसन आहे. व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुविधा आहे. त्यांची न्याय जोडो यात्रा येत्या 2 मार्चला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.दरम्यान, महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे. मालेगाव येथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून, नाशिकमार्गे ठाणे येथे यात्रेचा समारोप केला जाणार आहे.