जागतिक महिला दिनानिमित्त खास मल्टीस्टारर ‘लोकशाही’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

0
3

नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. येत्या ८ मार्च २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिकांना पुन्हा अभूतपूर्व अनुभव घेता येणार आहे.

समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे, मात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, डॉ. गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवण्यासाठी उतरले आहेत.

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केले असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायले आहेत, तसेच संजय अमर आणि शाम मळेकर यांनी गीत शब्दबद्ध केले आहेत.

“राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, आणि सत्तासंघर्ष ‘लोकशाही’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. या पद्धतीचे अनेक दर्जेदार चित्रपट आम्ही अल्ट्रा झकासच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी उपलब्ध करत राहणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies