Home Top News उत्तर महाराष्‍ट्राला गारपिटीचा तडाखा,चंद्रपुरात पाऊस

उत्तर महाराष्‍ट्राला गारपिटीचा तडाखा,चंद्रपुरात पाऊस

0

गोंदिया-िवदभार्सह उत्तरमहाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. नाशिकसह धुळे जिल्ह्याला दुसर्‍या दिवशीही गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उरली सुरली पिके गमवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. डाळिंब आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, कोकणात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. नाशिकमधील चांदवड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. औरंगाबादलाही पाऊस सुरु आहे.विदर्भातील चंद्रपूर येथे सुध्दा सायकांळी पावसाने हजेरी लावली तर गोंदिया भंडारा जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून पावसाची शक्यता वतर्थविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा व येवला या सात तालुक्यातील अनेक गावांना गुरुवारी सायंकाळी बेमोसमी पावसासह गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. यामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा आणि द्राक्षबागांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आज (शुक्रवारी) दुसर्‍या दिवशीही गारपिटचा तडाखा बसला आहे.

दुष्काळाने पोळणार्‍या विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याअभावी पिके वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे तर कोकणात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेल्या पीक गमवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version