
मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि ४ मार्च ) सकाळच्या सुमारास मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बीडच्या मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र संताप उसळला होता. या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवर मोठा दबाव वाढला. परिणामी, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत गेली.
अखेर वाढत्या जनक्षोभासमोर झुकत धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तो स्वीकारला आहे.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या, तर विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंच्या बडतर्फीची मागणी केली होती.अखेर वाढत्या राजकीय दबावामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.