Home Top News जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा

जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा शुक्रवारी राज्य सरकारकडून करण्यात आली. मुंबईच्या पालकमंत्रीपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रीपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची तर ठाण्याच्या पालकमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी दोन दिवसांत पालकमंत्र्यांचे नावे जाहीर केली जातील, असे सांगितले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा आणि पालकमंत्री
मुंबई – सुभाष देसाई
मुंबई उपनगर – विनोद तावडे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – गिरीश बापट
पालघर – विष्णू सावरा
बीड-लातूर – पंकजा मुंडे
सांगली-कोल्हापूर – चंद्रकांत पाटील
रायगड – प्रकाश मेहता
परभणी-नांदेड – दिवाकर रावते
रत्नागिरी – रवींद्र वायकर
नाशिक – गिरीश महाजन
जळगाव-बुलढाणा – एकनाथ खडसे
सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
औरंगाबाद – रामदास कदम
गडचिरोली – अंबरीश आत्राम
वर्धा-चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
भंडारा-उस्मानाबाद – डॉ. दीपक सावंत
गोंदिया – राजकुमार बडोले
जालना – बबनराव लोणीकर
हिंगोली – दिलीप कांबळे
अहमदनगर – राम शिंदे
सातारा – विजय शिवतारे
सोलापूर – विजय देशमुख
अमरावती – डॉ. प्रविण पोटे
अकोला-वाशिम – डॉ. रणजित पाटील
यवतमाळ – संजय राठोड
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

Exit mobile version