Home Top News पेट्रोलच्या दरात दोन रुपये कपात

पेट्रोलच्या दरात दोन रुपये कपात

0

– – वृत्तसंस्था
मुंबई – पेट्रोल व डिझेल या इंधनांचे दर सरकारने आज अनुक्रमे लिटरमागे 2.42 रुपये व 2.25 रुपये कमी केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाचा दर प्रति बॅरल आज 46.25 डॉलर होता. तेलाचे भाव अशा प्रकारे सातत्याने खाली येत असल्याने देशातही पेट्रोल व डिझेल यांचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र, या परिस्थितीमुळे सरकारी तिजोरीत इंधनापासून मिळणाऱ्या महसुलात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे आज सरकारने पेट्रोल व डिझेल यांवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवले. यापूर्वी एक तारखेला उत्पादन शुल्कात दोन रुपये वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2014 पासून केलेली ही चौथी उत्पादन शुल्कवाढ आहे.

Exit mobile version