Home Top News ओबामांच्या दौऱयाच्या निषेधार्थ नक्षल्यांची ‘भारत बंद’ची घोषणा

ओबामांच्या दौऱयाच्या निषेधार्थ नक्षल्यांची ‘भारत बंद’ची घोषणा

0

गडचिरोली-प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा राजपथावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारीला ‘भारत बंद’ची घोषणा नक्षलवाद्यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱया कमलापूर गावामध्ये नक्षलवाद्यांनी ‘भारत बंद’चे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. गावातील मुख्य चौकातही हे बॅनर लावण्यात आले आहेत. ओबामा यांच्या भारत दौऱयाचा निषेधासाठी नक्षलवाद्यांकडून ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या घोषणेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
ओबामा येत्या २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीमध्ये येत आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱया संचलनामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच राजपथावर होणाऱया संचलनासाठी येणार आहेत. ओबामा यांच्या दौऱयामुळे दिल्लीतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ओबामा आग्रामध्ये ताजमहालालाही भेट देणार आहेत. त्यामुळे तेथेही कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Exit mobile version