मुंबईत हाय अलर्ट;
मुंबई- मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 28 जानेवारीपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचीही माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दहशतवादी सिद्धीविनायक मंदिरात हल्ला घडवून आणू शकतात. ‘जमात-ऊल-दावा’, ‘लष्कर-ए तैयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या असून चौघांपैकी एक महाराष्ट्रात, दुसरी राजस्थानात, तिसरी उत्तर प्रदेशात आणि चौथी उडिशात पाठवण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांकडून देशात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे.
28 जानेवारी पूर्व दहशतवादी हल्ला करण्याचा कट पाकिस्ताना शिजविण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
मुंबईत हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या चार दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे.मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दहशतवादी समुद्रमार्गे भारतात घुसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. दहशतवादी अब्दुल्लाल कुरेशी हा दहशतवाद्यांचा म्होरक्या असून त्याला नाजीर अली, जाबेद इक्बाल, नाबिद झेमन आणि समशेर हे चार दहशतवादी सहकार्य करणार आहेत, असे गुप्तचर विभागाने पोलिसांना माहिती दिली आहे.