Home Top News देशाच्या उत्पन्नात 40 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा

देशाच्या उत्पन्नात 40 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा

0

मुंबई-देशाच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा सर्व राज्यांकडून केंद्राला मिळत असतो. राज्य ही कमाई विविध टॅक्स लावून करते. गेल्या पाच वर्षापासून राज्यांनी देशाची तिजोरी भरण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. यात सर्वाधिक योगदान महाराष्ट्राने दिले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र आजही देशात सर्वात पुढे आहे. त्यामुळे याच राज्यातून सर्वात जास्त टॅक्स मिळतो.
महाराष्ट्राने दिले सर्वात जास्त उत्पन्न-
महाराष्ट्र- भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. याचबरोबर सर्वात जास्त शहरे याच राज्यात आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे तिसरे राज्य आहे तर लोकसंख्याबाबत उत्तर प्रदेशनंतर दुस-या क्रमांकावर आहे. देशातील एकून 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून देशाला मिळते. एका ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्र टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राने भारताच्या तिजोरीत 76 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4 लाख 75 हजार 800 रुपये कोटी एवढी रक्कम कररूपाने दिली आहे.
आंध्र प्रदेश-टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत आंध्र प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. आंध्रने मागील 5 वर्षात देशाच्या तिजोराती 54 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 3,37,500 कोटी रूपयांचा टॅक्स दिला आहे.
यूपी-टॅक्स रेवेन्यूत तिस-या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. सर्वात मोठ्या राज्याने मागील 5 वर्षात 50 बिलियन डॉलर म्हणजेच 3 लाख 12 हजार 500 रुपयेचा टॅक्स देशाला दिला आहे.
तमिळनाडू-टॅक्स रेवेन्यूच्याबाबतीत चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. गेल्या 5 वर्षात तमिळनाडू राज्याने देशाला सक्षम करण्यासाठी 46 बिलियन डॉलर म्हणजेच 2 लाख 87 हजार 500 रुपये कोटींचा टॅक्स दिला आहे.
कर्नाटक-टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत कर्नाटक पाचव्या स्थानावर आहे. गेल्या 5 वर्षापासून कर्नाटने देशाच्या तिजोरीत 42 बिलियन डॉलर म्हणजेच 2 लाख 62 हजार 500 कोटी रुपये टॅक्स दिला आहे.
गुजरात-मोदींच्या गुजरातमध्ये मागील काळात चांगला विकास दर वाढला आहे. टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत गुजरातनेही योगदान दिले आहे. मागील 5 वर्षात गुजरातने देशाला 30 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख 87 हजार 500 कोटी रुपये महसूल दिला आहे
पश्चिम बंगाल-टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत पश्चिम बंगालने मागील 5 वर्षात 29 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख 81 हजार 250 कोटी रुपये महसूल देशाला दिला आहे.

Exit mobile version