
नवी दिल्ली, २६ – देशात 66 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यामुळे हा सोहळा अधिक खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
राजपथावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या उपस्थित लष्कराचे संचलन सुरू आहे. यात नयनरम्य पद्धतीने भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यात आले. त्यानंतर देखाव्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन ओबामांना घडवण्यात आले. त्याआधी भारताचे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या उपस्थितत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शहीद जवानांच्या वीर पत्नींना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमर ज्योतीवर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
परेडमध्ये प्रथमच महिला लष्करी अधिकार्यांच्या तुकडीनेही संचलन केले. या देखाव्यांमध्ये पंतप्रधानांच्या जन धन योजनेची झलकही दिसणार आहे. दिल्लीत सुमारे एक लाख सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीत सुमारे 15 हजार सीसीटीवी कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच सर्व उंच इमारतींवर शार्प शूटर्स तैनात करण्यात आले आहेत. राजपथाचा प्रत्येक कोपरा हायटेक सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या टप्प्यात असणार आहे. त्यासाठी एक खास कंट्रोलरूम तयार करण्यात आली
सकाळी पावणे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमर ज्योती जवान येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दहाच्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व सोहळ्यातील प्रमुख पाहुणे बराक ओबामा यांचे राजपथावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही वेळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राजपथावर पोहोचले. राष्ट्रपतींचे मंचावर आगमन झाल्यावर राष्ट्रगीत सुरु झाले व २१ तोफांच्या सलामीत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर शहीद मेजर मुकुंद वर्दराजन आणि नायक नीरजकुमार सिंह यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शहिदांच्या पत्नींनी हा सन्मान स्वीकारला. अशोक चक्र प्रदान केल्यावर प्रजासत्ताक दिनी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संचलनाला दिमाखात सुरुवात झाली.
मेजर जनरल सुब्रतो मित्रा यांच्याकडे परेडचे नेतृत्व
– 51 घोडेस्वारांचे पथक राजपथावर
– टी-90 भीष्ण या भारत आणि रशियाने विकसित केलेल्या रणगाड्याचे पथसंचलन
– टी-72 या रणगाड्यासह जवानांची सलामी
– 1890 पिनाका भारतीय बनावटीच्या रॉकेट लाँचरचे पथसंचलन
– भारत आणि रशिया बनावटीचे ब्रम्होस या क्षेपणास्त्राचे पथसंचलन
– कोअर ऑफ सिग्नल यंत्रणेचे पथसंचलन
– एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे पथसंचलन
– कॅप्टन दिव्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांच्या तुकडीची सलामी
– हैदराबाद, खडकी येथील बँड पथकाकडून पथसंचलन
– ब्रिगेड ऑफ गार्डकडून राष्ट्रपतींना सलामी
– कॅप्टन एस. डी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जाट रेजिमेंटचे पथसंचलन
– शीख रेजिमेंटची सलामी
– गोरखा रेजिमेंटच्या बँड पथकाची सलामी
– कॅप्टन राहुल खजोरिया यांच्या नेतृत्वाखाली गोरखा रेजिमेंटची सलामी
– लेफ्टनंट कमांडर संध्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या जवानांचे पथसंचलन
– प्रथमच भारतीय वायुसेनेच्या महिलांचे पथक सहभागी
– संध्या शेखावत यांच्या नेतृत्वाखाली महिला पथकाची सलामी
– राजीव तिवारी यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओच्या पथकाचे पथसंचलन
– माजी सैनिकांची सलामी
– सब इन्स्पेक्टर पंकज रावल यांच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांचे बँडपथक
– डेप्युटी कमांडर राकेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बीएसएफच्या जवानांचे पथसंचलन
– बीएसएफकडून वापर होत असलेल्या उंटांचेही पथसंचलन
– सीमा सुरक्षा दलाचे पथसंचलन, मोहम्मद शाहनवाज यांच्या नेतृत्वाखाली