रत्नागिरी- रत्नागिरीतील जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करण्यासाठी निघालेला शिवसेनेचा आंदोलन मोर्चा पोलिसांनी एक किलोमीटर अलीकडेच रोखून धरला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. आज सकाळपासूनच जैतापूरमधले वातावरण तणावाचे आहे.
दरम्यान, अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करणारच, असा निर्धार शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केला आहे. पोलिसांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी प्रकल्प कार्यालय परिसर, राजापूर, जैतापूर, नाटे परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे