ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार लोकजागरचा मुख्य अजेंडा- प्रा. ज्ञानेश वाकुडकर

0
26

समतावादी हिंदू धर्म पुस्तकाचे थाटात लोकार्पण
गोंदिया,दि.24 :-केंद्र सरकारनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचं स्पष्ट नाकारलं असून राजकीय आरक्षण देखील धूर्तपणे काढून घेतलं आहे. त्यामुळे ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार हा लोकजागर अभियानाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन लोकजागरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
ते येथील संताजी लॉन सभागृहात आयोजित लोकजागरच्या गोंदिया जिल्हा दौऱ्या निमित्त आयोजित बैठकीला संबोधित करतांना बोलत होते. याप्रसंगी, प्रमुख अतिथी म्हणून लोकजागरचे प्रदेश सचिव नंदकिशोर आलोने, संपर्क प्रमुख सि. एम. लोणारे, पश्चिम विदर्भ अमरावतीचे संयोजक ऍड. प्रभाकर वानखडे,डॉ. विनोद भोयर,समाजसेविका सविता बेदरकर,विचारवंत शुध्दोधन शहारे,ओबीसी सघंर्ष समितीचे तालुकाध्यक्ष हरिष ब्राम्हणकर, प्रदेश सचिव मनिष नांदे,उमेंद्र भेलावे,महेंद्र कटाणे आदी उपस्थित होते.महामानव यांच्या प्रतिमेला हारार्पण करून प्रा. ज्ञानेश वाकुडकर लिखित समतावादी हिंदू धर्म या पुस्तकाचे लोकार्पण उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण, आमची जनगणना आम्हीच करणार !
ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार ही त्रिसूत्री समोर ठेवून पुढील दिशा ठरविणारा लोकजागरच्या पूर्व विदर्भ दौऱ्याची सुरुवात भंडारा जिल्ह्यापासून करण्यात आली.दौर्याचा आजचा दुसरा दिवशी गोंदियात छोटेखानी सभा घेण्यात आली.
सदर दौऱ्यात दिनांक 25 ला ब्रम्हपुरी, 26 ला चंद्रपूर, 27 ला गडचिरोली , 28 ला वर्धा याप्रमाणे दौरा आयोजित आहे.
लोकजागर ही सामाजिक संघटना आहे.सामाजिक समता, न्याय, लोकशाही यावर विश्वास असलेली आणि वरील त्रिसूत्री मान्य असलेली समाजातील बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी वगैरे सर्व समविचारी लोकांचं या दौऱ्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत राहील असे प्रा. ज्ञानेश वाकुडकर सांगितले.
कार्यक्रमास ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,वर्षा भांडारकर,ओबीसी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे,विनायक येडेवार,खेमेंद्र कटरे, सी.पी.बिसेन,संतोष खोब्रागडे,पी.डी.चव्हाण, हरिष राऊत,आत्माराम तरोणे,ए.डी.शरणागत,चंद्रकात चामट,जगेश्वर पटले,हिरालाल महाजन,भजनदास बिजेवार,पुरुषोत्तम टाकरे,उदय़ पिल्लारे ,यु.एन डोलारे,सुनिल भजे,अतुल सतदेवे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.बैठकीचे संचालन भुमेश शेंडे यांनी तर प्रास्ताविक नंदकिशोर आलोने तर आभार एस.यु.वंजारी यांनी मानले.