मुलगी जन्माला आल्यास नगरपंचायततर्फे 1 हजाराची सुरक्षा ठेव-मुख्याधिकारी अजय पाटणकर

0
26

देवरी 24: पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलांच्या जन्मावेळी उत्साह आणि मुलींच्या जन्मावेळी निराशा व्यक्त केली जाते. त्यामुळे कितीतरी नवजात मुलींचा जन्मापूर्वीच गर्भपात करून बळी घेतला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस मुलीच्या जन्मदरात घट होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे.त्यामुळे मुलींच्या जन्मदरातील घट रोखण्यासाठी आणि मुलीचे महत्व कुटूबांमध्ये किती महत्वाचे आहे,हे पटवून देण्याच्या निमित्ताने सामाजिक परिवर्तन  घडविण्यासाठी नगरपंचायत देवरीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी नगरपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या सम्मतींने ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात देवरी नगरपंचायतीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपंचायत देवरी द्वारे मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असून या उपक्रमातून मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून मुलगी जन्मास आल्यानंतर प्रत्येकी 1 हजार रुपये ठेव स्वरूपात ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतला आहे. यामुळे मुलींचा जन्म दरात वाढ होण्यास नक्कीच मदत मिळणार असल्याचे देवरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी म्हटले आहे.