आरटीई फाउंडेशनच्यावतीने नवनिर्वाचित शिक्षक आमदार अडबालेना निवेदन

0
16

गोंदिया,दि.13 :- आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया कार्यकारिणीद्वारे आरटीई फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे, जिल्हा सचिव सुनील आवळे यांच्या उपस्थितीत व आरटीई चे सर्व पदाधिकारी, सर्व संस्था संचालकांच्या यांच्या सहकार्याने नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना खाजगी कायम विनाअनुदानित शाळांना येत असलेल्या अडचणीचे निराकरण करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .मुख्यतः 2012-13 ते 2022-23 पर्यंतची प्रलंबित असलेली गोंदिया जिल्ह्य़ाची 32 कोटी आरटीई प्रतिपूर्ति त्वरित संस्थांना देण्यात यावी.यापूर्वी दोन वेळा शिक्षणाधिकारी तसेच जि.प.अध्यक्ष यांना आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे.त्याचबरोबर आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिलेल्या शाळेतच वर्ग 1 ते 8 वी पर्यंतचे शिक्षण त्याच शाळेत घेणे बंधनकारक करावे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आमदार निधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी लाभ प्राप्त व्हावे .तसेच टीसी विना प्रवेश कायदा शासनाने रद्द करावे. असे मागणी पत्र आरटीई फाऊंडेशन जिल्हा गोंदिया कार्यकारिणी द्वारे करण्यात आली.