Home Uncategorized सभासद हित केंद्रस्थानी ठेवून अल्प व्याज दरात केला जातोय कर्ज पुरवठा- सचिव...

सभासद हित केंद्रस्थानी ठेवून अल्प व्याज दरात केला जातोय कर्ज पुरवठा- सचिव कमलेश बिसेन

0

गोंदिया- जिल्हा परिषद व पंचायत समिति कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित गोंदिया रजि.न.102 ची निवडणूकीनंतर माहे नोव्हेंबर 2022 पासून संस्थेमध्ये नवीन व्यवस्थापक समिती अस्तित्वात आली.सदर व्यवस्थापक समितीने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासणाची पूर्तता पाहिल्याच विशेष आमसभेत पूर्ण केली. त्यातील अतिशय महत्वपूर्ण अशी घोषणा कर्जावरील व्याज दर राष्ट्रीयकृत बँकेच्या गृहकर्ज पेक्षा कमी व्याजदर करणे हे होतेआणि त्याची पूर्तता करून व्याजदर ८.७५ करण्यात आल्याची माहिती संस्था कार्यकारी प्रमुख सचिव कमलेश बिसेन यांनी  दिली आहे. सचिव कमलेश बिसेन यांनी पुढे सांगितले की संस्था सभासद यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना सर्वात कमी व्याज दरामध्ये एका फॉर्मवर रुपये वीस लक्ष कर्ज दिले जात आहे.यापूर्वी ११ टक्के निवडणूक पूर्वी १० टक्के ने कर्ज मिळत असल्यामुळे सभासद कर्ज उचल करीत नव्हते.त्यामुळे संस्थेकडे निधी पडून राहत होता त्याचे नुकसान संस्थेला व सभासदांनाही व्हयाचा.मात्र आता माहे नोव्हेंबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंत एकूण नऊ कोटी कर्ज वाटप करण्यात आले. तर 22 -23 या आर्थिक वर्षात माहे मार्च ते एप्रिल पर्यंत 18 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले.या कालावधीत २७ कोटी रुपये कर्ज वाटप झाले असून पुन्हा ५ कोटी रुपये कर्जाचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती बिसेन यांनी दिली.संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून संस्थेमधून 8.75 गृहकर्जाप्रमाणे सभासदांना कर्ज वाटप करण्याचे निर्धारित केले आहे. त्यानुसार सभासदांची कर्जाची मागणी सुद्धा वाढली आहे .आरोग्य संजीवनी योजना अंतर्गत गंभीर आजारी सभासद यांना तातडीची मदत पाच लक्ष रुपये पर्यन्त केली जात आहे .सोबतच कुटुंब कल्याण निधी योजना पुनर्जीवित करण्यात आलेली आहे.त्या अंतर्गत मय्यत झालेल्या सभासद यांच्या कुटुंबांना कर्ज माफ करून आर्थिक लाभ देवून दिलासा देण्याचा काम केले जात आहे.कुटुंब कल्याण निधि योजने अंतर्गत ४२ लक्ष ३८ हजार रुपयाचे रोखीने लाभ अशा कुटुंबांना देण्यात आले आहेत.त्याच बरोबर सभासद यांच्या पाल्यांकरिता उच्च शिक्षण करिता एक टक्के कमी व्याज दर ७.७५ टक्के दराने कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे . यापूर्वी व्याज दर तसेच इतरही बाबी मुळे सभासदत्व रद्द करणार्याे सभासद यांनाही सभसदत्व देण्यात आले असून सभासद संख्या सेवानिवृत्ती मुळे कमी होत असूनही गंगाजळी मात्र ५० कोटी च्या वर गेलेली आहे .त्यामुळे योग्य नियोजन सह संस्थेची प्रगती साधली जात असून त्याच वेळी सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती सचिव कमलेश बिसेन यांनी दिली आहे .
असे असले तरी व्याजदर कमी केले असले मुळे साहजिकच कर्जाची मागणी वाढली आहे सध्या एवढे कमी व्याज दर मध्ये कोणतीही बँक व संस्थेत कर्ज उपलब्ध नसले मुळे सर्व सभासद यांची धाव वाढली आहे परंतु संस्थेच्या सभासदांचे वेतन फरवरी , मार्च व एप्रिल ची होण्यास होते व फरवरी हा इन्कम टॅक्सचा महिना असल्याने व मार्चमध्ये वेतन उशिरा होत असल्यामुळे सभासदांना कर्ज वाटप करण्यास विलंब होत आहे. ही परिस्थिति कायम राहणार नसून तात्पुरती आहे एक ते दोन महिन्यात सर्व कर्ज प्रकरणे निकाली काढले जातील काही असामाजिक तत्वांद्वारे पसरविण्यात आलेल्या अफवे ला भिक न घालता तोपर्यंत सभासद यांनी परिस्थिति समजून घेवून ध्येर्य पूर्वक संस्था ला सहकार्य करावे असे आव्हान सचिव कमलेश बिसेन यांनी केले आहे.

Exit mobile version