
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. सीमा देव गत काही वर्षांपासून अल्झायमरने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज सकाळी त्यांनी मुंबईतील आपल्य राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात अभिनेते अजिंक्य व अभिनय ही 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.