शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या तयारीसाठी  बैठकीचे आयोजन

0
3

भंडारा, दि.7 : राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असलेला शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात विविध विभागांनी मिळून दोन लक्ष दाखले तसेच लाभंचे वाटप सामान्य नागरिकांना केले आहे.

       शासन आपल्या दारी बाबत लवकरच जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात  नागरिकांना विविध शासकीय योजनेचे लाभ तसेच दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ वाटप होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन सुरू असून जिल्हाधिकारी श्री.योगेश कुंभेजकर यांनी सर्व विभागांची बैठक यासाठी आयोजित केली आहे.

       उद्या अकरा वाजता जिल्हा कचेरीत होणाऱ्या बैठकीसाठी सर्व विभाग प्रमुखाने उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

       भंडारा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या उपक्रमांमध्ये शासनाच्या विविध विभागांच्या लाभांचे वाटप शिबिरांच्या माध्यमातून तसेच गावागावात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांना प्रशासनामार्फत दाखले देण्यात आलेले आहेत.

        राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडे कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पद्धतीने झाले असून भंडारा जिल्ह्यातही या कार्यक्रमाचे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.