गोंदिया,दि.24ः-शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासुन संग्राम (संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र) व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणुन हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत.त्या परिचालकांचे मानधन देण्यासह शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात तसेच इतर मागण्याचे निवेदन आमदार विनोद अग्रवाल यांनी सगंणक परिचालक संघटनेच्यावतीने (दि.२३) देण्यात आले.निवेदन देते वेळी जितेंद्र साखरे जिल्हा अध्यक्ष, प्रमोद गौतम जिल्हा सचिव, टोलिराम नेरकर जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश दसेरिया, सुकलाल मच्छीरके, कृष्णा ब्राम्हनकर, किरणभाऊ टेंभरे, महेश माहुलें, अनिलकुमार भांडारकर, राजेश बाहे ,दिनेश जे.रहागडाले व इतर उपस्थित होते.