सम्राट अशोकांसारखे बौद्ध धम्माचा प्रसार-प्रचार करुन विचार पेरु-मुन्नाभाई नंदागवळी

0
279

अर्जुनीमोरगाव ,दि.26ः : तथागत बुद्धानंतर बौद्धधम्म रुजविला तर ते म्हणजे राजे सम्राट अशोक यांनी, अठ्ठावीस हजार विहारे तर चौ-यांशी हजार स्तूप बांधून अशोक राज्यानी बौद्धधम्माचा प्रसार-प्रचार केला, असेच आम्ही सम्राट अशोकांसारखे बौद्धधम्माचा प्रसार-प्रचार जनमाणसात करु असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी डोंगरगाव(कवठा) येथील कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.

यावेळी मंचावर समाजाचे अध्यक्ष रमेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे दिलवर रामटेके, प्रभाकर दहीकर, शिशुपाल डोंगरे, विनोद नाकाडे, प्रमोद नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, अंतर पाळत सामूहिक पंचशील ग्रहन करण्यात आले, माला अर्पण करून भोजनही करण्यात आले. पुढे नंदागवळी म्हणाले- जर बुद्ध, अशोक आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जर बौद्ध धम्म जगाला दिला नसता तर अनेक नागरिक हे गुलामीतच असते, बंधने, हक्क, अधिकारही मीळाले नसते, म्हणूनच बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करणे आपले काम आहे.

कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री. मेश्राम यांनी करुन यशस्वितेसाठी पितांबर बोरकर, मिथून मेश्राम, प्रकाश ऊके, रजनिश तागडे, नाजुका रामटेके, पोर्णिमा बोरकर, पलक रामटेके, किरण ऊके, रोशन संजय मोटघरे, यांनी परिश्रम घेतले.