समस्यांचे निराकरण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू

0
88

देवरी,दि.27ःडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आपण आमदार झालो. बाबासाहेबांच्या विचारांची आपल्याला जान आहे. आपण सदैवच बहुजनांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आमदार सहेषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील सिरपूरबांध येथे गुरुवार २२ ऑक्टोबर रोजी तथागत वाचनालयात ग्रंथमित्र अँड. डॉ. र्शावण उके यांच्यातर्फे माजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात कोरोटे बोलत होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोटे यांचा सत्कार व क्रांतिवीर तिलका मांझी यांच्या फोटोचे अनावर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेश्याम बगडीया होते. पाहुणे म्हणून प्रसंगी जिप सदस्या उषा शहारे, संदिप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, वाचनालयाचे अध्यक्ष शारदा ऊके, सचिव प्रशांत उके, प्रेरणा उके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी वाचनालायातर्फे अँड. डॉ. र्शावण ऊके यांच्या हस्ते कोरोटे यांचा शाल, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, राष्ट्रीय ग्रंथ भारतीय संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी कोरोटे यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिवीर तिलका मांझी यांच्या फोटोचे अनवार करण्यात आले. फोटोच्या खाली तिलका मांझी यांनी केलेल्या अमूल्य कायार्चे आणि त्यांना इंग्रजांनी फासी का दिली याची माहितीचा उल्लेख आहे. यावेळी उषा शहारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. डॉ. र्शावण ऊके यांनी केले. संचालन शारदा ऊके यांनी केले. आभार सुरेंद्र कानेकर यांनी मानले.