मावा तुळतुळ्याने नुकसान झालेल्या शेतकèयाना नुकसान भरपाई द्या-आ.रहागंडालेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
150

गोंदिया,दि.२७- जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकरी धानपिक उत्पादन घेत असून सद्या हलक्या प्रतीचे धान कापणीला सुरुवात झालेली आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्यात वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकèयांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान उत्पन्नात घट झालेली आहे. यातच ऐन धान कापणीच्या वेळेला मावा-तुळतुळा रोगाच्या प्रादुर्भावाने धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून कोरोणा महामारीत शेतकèयांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याच्या परिस्थितीत शासनाने मावातुडतुडाने नुकसान झालेल्या धानपिकाचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन आमदार विजय रहागंडाले यांनी जिल्हाधिाकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.