गोंदिया,दि.3 – गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 3 नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 88 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 75 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आमगाव येथील 57 वर्षीय रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज 88 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-33, तिरोडा तालुका-03, गोरेगाव तालुका-07,आमगाव तालुका-09, सालेकसा तालुका-09, देवरी तालुका-01, सडक/अर्जुनी तालुका-16, अर्जुनी/मोरगाव तालुका-09 रुग्ण आणि इतर राज्य/जिल्हा-01 रुग्ण आढळून आला.
आजपर्यंत तालुकानिहाय जिल्ह्यात आढळलेले बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-5635, तिरोडा तालुका-1147, गोरेगाव तालका-411,आमगाव तालुका-714, सालेकसा तालुका-433, देवरी तालुका-468, सडक/अर्जुनी तालुका-475, अर्जुनी/मोरगाव तालुका-561 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-117 रुग्ण आहे. असे एकूण 9961 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालय तसेच कोविड केन्द्रात उपचार घेत असलेल्या 75 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय ती रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-40, तिरोडा तालुका-00, गोरेगाव तालुका-02, आमगाव तालुका-08, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका-05, सडक/अर्जुनी तालुका-05, अर्जुनी/मोरगाव तालुका-12 व इतर राज्य/जिल्हा-01 असे रुग्ण आढळले आहे.
9149 रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-5188, तिरोडा तालुका-1104, गोरेगाव तालुका-377, आमगाव तालुका-661, सालेकसा तालुका-385, देवरी तालुका-449, सडक/अर्जुनी तालुका-408, अर्जुनी/मोरगाव तालुका-481 आणि बाहेर जिल्हा/राज्यातील 96 रुग्णांचा समावेश आहे.
क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या 682 आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-373, तिरोडा तालुका-25, गोरेगाव तालुका-29, आमगाव तालुका-45, सालेकसा तालुका-46, देवरी तालुका-15, सडक/अर्जुनी तालुका-63,अर्जुनी/मोरगाव तालुका-75 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 11 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
355 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-182, तिरोडा तालुका-12, गोरेगाव तालुका-15, आमगाव तालुका-29, सालेकसा तालुका-35, देवरी तालुका-07, सडक/अर्जुनी तालुका-37, अर्जुनी/मोरगाव तालुका-38 रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 91.22 टक्के आहे. बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.17 टक्के आहे. तर डब्लिंग रेट 93.5 टक्के असा आहे.
जिल्ह्यातील 130 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-74, तिरोडा तालुका-18, गोरेगाव तालुका-5, आमगाव तालुका-8, सालेकसा तालुका-2, देवरी तालुका-4, सडक/अर्जुनी तालुका-4, अर्जुनी/मोरगाव तालुका-5 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 39081 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 29736 नमुने निगेटिव्ह आले. तर 6167 नमुने पॉझिटिव्ह आले. 86 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 38464 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 34607 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3857 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.
कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा.