देवरी,दि.08ः-उमेदचे खाजगीकरण थांबवावे यासह अन्य मागण्यांसाठी उमेदच्या कर्मचाऱ्यांनी महिला बचत गटांनी विविध मार्गाने आंदोलन करुन निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले असले तरीही अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने कर्मचाऱ्यांनी(दि.5 पासून)कामबंद आंदोलन सुरू केले.
संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण उपजीविका अभियान उपक्रमांना व्यापक स्वरूप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावेत असे शासन स्तरावर सुचविते तर एका बाजूला कर्मचारी कमी करून अभियानाला खाजगीकरण करण्याचे कटकारस्थान करत आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण,आत्मनिर्भर भारत ,स्थानिक उद्योग मजबूत कसे होईल होईल हा संशोधनाचा विषय आहे.
उमेदच्या कंत्राटी कर्मचऱ्याना पुनर्नियुक्ती देण्यात यावी,खाजगीकरण करण्यात येऊ नये.10 सप्टेंबरचे शासन निर्णय निरर्मित परिपत्रक रद्द करण्यात यावे अशा मागण्या घेऊन उमेदच्या कर्मचाऱ्यांनी ,महिलांनी धरणे आंदोलन मुकमोर्चा काढला यातून शासनाचे लक्ष वेधले मात्र अजूनही शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कल्याणकारी मंडळाच्या बॅनरखाली कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झाले आहेत.