देवी महाकालीचे मंदिर भाविकांसाठी खुले

0
427

 चंद्रपूर- विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी एक असणारे आराध्यदैवत देवी महाकालीचे मंदिर सोमपासून भाविकांसाठी खुले झाले आहे. रविवारी सायंकाळी याबाबतचा प्रशासनाचा आदेश मिळाल्याने अखेर मंदिर खुले होण्यास परवानगी मिळाली होती. दरम्यान मंदिर खुले होत असले तरी भाविकांना करोनाचे संकट बघता गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नसून तूर्त केवळ मुखदर्शनच घेता येणार असल्याचे श्री महाकाली देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोव्हीड-१९ बाबत प्रशासनाने स्पष्ट सांगितलेल्या मार्गदर्शक नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.