चक्रवर्ती राजाभोजबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणार्यावर कारवाई करा

पोवार समाजाचे गृहमंत्र्याना निवेदन,पोलीस ठाण्यात तक्रार

0
524

नागपूर,गोंदिया/तिरोडा,दि.21ः- देशातील विविध राज्यात बसलेल्या पोवार(पवांर,परमार,भोयर पवार)समाजाचे कुलश्रेष्ठ अग्निवंशी क्षत्रिय चक्रवर्ती राजाभोज यांच्याबद्दल अवमानास्पद व अशोभनीय अपशब्दाचा वापर करणार्यावर तत्काळ कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन व तक्रार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह तिरोडा,नागपूरसह विविध पोलीस ठाण्यात पोवार समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.राष्ट्रीय पवांर क्षत्रिय महासभेच्यावतीने संगठन सचिव खेमेंद्र कटरे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पत्र पाठवून सदर प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.बिहार राज्यातील पटना येथील अखिल भारतीय तेली महासभा नावाने असलेल्या एका फेसबुक पेजवर गोंदियातील जगदिश घाटोळे नामक युवकांने अपशब्दाचा वापर करुन सोशल मिडियात प्रसारित करुन चक्रवर्ती राजाभोज यांचा अवमान केल्याप्रकरणात तिरोडा पोलीस ठाण्यात देवेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक आमदार विजय रहागंडाले,बाबा भैरम,पोवार समाज एकता मंच परिवार पुर्व नागपूर व राष्ट्रीय पोवारी साहित्य कला संस्कृती मंडळाच्यावतीने हिरदीलाल ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.