अर्जुनी मोरगाव,दि.९- तालुक्यातील येलोडी (जांभळी) येथे धुमाकूळ घालून कोंबड्यांना फस्त करणाèया बिबट्याला मंगळवारी रात्री जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
गत महिनाभरापासून येलोडी (जांभळी) या गावात व परिसरात बिबट्याने बस्तान मांडले होते. रात्रीच्या वेळी गावात घुसून अनेक नागरिकांच्या घरातून त्याने कोंबड्या फस्त केल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावण निर्माण झाले. दरम्यान, मध्यंतरीच्या कालावधीत या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार वनविभागाचे पथक गावात ठाण मांडून होते. परंतु, चतूर बिबट हातावर तुरी देऊन पसार व्हायचा. तथापि, मगंळवारी (ता. ८) रात्री बिबट कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी गावात शिरला. त्याने सुखदेव कोडापे यांचे घर गाठले. मात्र गावकरी पाळत ठेऊन असल्याने बिबट्याला कोंबड्यांच्या खोलीत येताच खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती गस्तीपथक व पवनी वनक्षेत्राधिकाèयाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याला वनविभागाच्या qपजèयात जेरबंद केले. त्यामुळे गावकèयांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी पवनी क्षेत्राचे आर. व्ही. धोटे, बी. एस. सोनवाने, व्ही. एन. चौरे, मेश्राम, पंचायत समिती सदस्य प्रेमलाल गेडाम, सरपंच नरेश हुडगेवार, अमर वाडीभस्मे, वनकर्चामरी डोये, कु. व्ही. एस. मेश्राम, सी. आर. गोडे, सीम ‘सरा‘, रमन भोंडे यांच्यासह इतर वनकर्मचारी व गावकरी उपस्थित होते.