
भंडारा दि. 15:- जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचार आज संपणार आहे. निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 468 मतदान केंद्रावर 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यात तुमसर-18, मोहाडी-17, भंडारा-35, पवनी-27, साकोली-20, लाखनी-20 व लाखांदूर-11 अशा एकूण 148 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
461 प्रभागातून 1236 सदस्य निवडून द्यायचे आहे. यासाठी निवडणूकीमध्ये 2 हजार 745 उमेदवार असून तुमसर तालूक्यात 160-जागासाठी 386 उमेदवार, मोहाडी 141 जागासाठी 349 उमेदवार , भंडारा 305 जागासाठी 685 उमेदवार, पवनी 215 जागासाठी 484 उमेदवार, लाखनी 156 जागासाठी 324 उमेदवार, साकोली 160 जागासाठी 294 उमेदवार व लाखांदूर 99 जागासाठी 223 उमेदवार रिंगणात उभे आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 461 प्रभाग असून त्यात तुमसर-59, मोहाडी-52, भंडारा-111, पवनी-82, लाखनी-62, साकोली-60 व लाखांदूर-35 यांचा समावेश आहे. छाननीअंती वैध नामनिर्देशन पत्र 3 हजार 117 असून यात तुमसर-425, मोहाडी-399, भंडारा-754, पवनी-538, लाखनी-423, साकोली-333 व लाखांदूर-245 यांचा समावेश आहे, तर 372 नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यात आले आहे.
148 ग्रामपंचायातीसाठी निवडणूक होणार असून 2 लाख 11 हजार 191 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात पुरूष-1 लाख 8 हजार 85 तर महिला-1 लाख 4 हजार 212 व ईतर एक मतदाराचा समावेश आहे. तालुका निहाय पुरुष-स्त्री मतदार तुमसर तालुक्यातील पुरुष- 14 हजार 459 तर महिला- 13 हजार 717 असे एकूण 28 हजार 176 मतदार, मोहाडी तालुक्यातील पुरुष- 12 हजार 710 तर महिला- 12 हजार 402 असे एकूण 25 हजार 112 मतदार, भंडारा तालुक्यातील पुरुष- 28 हजार 294 तर महिला- 27 हजार 570 असे एकूण 54 हजार 757 मतदार, पवनी तालुक्यातील पुरुष- 17 हजार 913 तर महिला- 16 हजार 712 असे एकूण 34 हजार 625 मतदार, लाखनी तालुक्यातील पुरुष- 13 हजार 99 तर महिला- 12 हजार 881 व इतर एक असे एकूण 25 हजार 981 मतदार, साकोली तालुक्यातील पुरुष- 12 हजार 409 तर महिला- 12 हजार 29 असे एकूण 24 हजार 438 मतदार व लाखांदूर तालुक्यातील पुरुष- 9 हजार 201 तर महिला- 8 हजार 901 असे एकूण 18 हजार 102 मतदारांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 468 मतदान केंद्र असून 526 केंद्राध्यक्ष, तर 1 हजार 578 मतदान अधिकारी, 512 पोलीस व 481 कर्मचारी असे एकूण 3 हजार 555 अधिकारी व कर्मचारी निवडणूकीच्या कामासाठी सज्ज करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.