
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-– सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथे कोरोना योद्धा सन्मान करण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सात वर्षांचे कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे वतीने खोडशिवनी येथील फ्रंटलाईन वर्करचे कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आले.सन्मानपत्राचे वाटप भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्षकुमार मोदी , सामाजिक कार्यकर्ते मदन साखरे, सरपंच उर्मिला कंगाले, पोलीस पाटील भृगंराज परशुरामकर, उपसरपंच टेकराम परशुरामकर व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी हर्षकुमार मोदी यांनी सांगितले की,सध्या जगावर कोविड-१९ कोरोना महामारीचे संकट असून या महामारीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्त्वात सर्व देश या महामारीचा मुकाबला करण्यास सज्ज आहे.या कार्यात फ्रंटलाईन वर्कर मोठ्याप्रमाणात योगदान देत असून त्यांचे अथक परिश्रमामुळे आपण या त्रासदीचा सामना करू शकतो.त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे वतीने गावातील २० फ्रंटलाईन वर्करांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
विलास मेश्राम,न्याहामुर्ते परिचारिका,एस.व्ही.झलके परिचारिका,,छायाताई खोब्रागडे,देवकन्या राऊत,योगिता परशुरामकर,भारती क-हाडे, वनीता हाडगे, नरेंद्र लंजे, मनोहर परशुरामकर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.या कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेकराम परशुरामकर व आभार भृगंराज परशुरामकर यांनी केले.





