
गोरेगाव, दि.3 : ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दत्तमंदिर डोंगरुटोला ते सटवा या 2.72 किमी रस्त्याकरिता 171 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
अध्यक्षस्थानी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार हेमंत पटले होते. या वेळी प्रामुख्याने माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, बॅँक डायरेक्टर रेखलाल टेंभरे, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव कटरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दुर्गा ठाकरे, भाजप जिल्हा किसान आघाडी उपाध्यक्ष सुरेंद्र बिसेन, जिल्हा सचिव गुड्डू ठाकरे, माजी जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, रोहिणी वरखडे, माजी पं.स. सदस्य पुष्पराज जनबंधु, सरपंच विनोद पारधी, शकुंतला कटरे, अनंता ठाकरे, उपसरपंच होमेन्द्र तांडेकर, ओमप्रकाश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, योगेश चौधरी, संतोष रहांगडाले उपस्थित होते.