स्वभिमान बचत फाऊंडेशनची गरीब मुलाला आर्थिक मदत

0
44

गोरेगांव,दि.20ः– तालुक्यातील मोहाडी येथील स्वाभिमान बचत फाऊंडेशनच्यावतीने मोहाडी येथीलच शांताराम बोपचे यांचा 7 वर्षीय मुलाची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून 6000 रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.बोपचे यांचा मुलगा हा घराशेजारीच खेळत असताना त्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोंदियाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.मुलाच्या वडीलाची परिस्थिती हलाखीची असल्याने गावातील नागरिकांनी व स्वाभिमान बचत फाऊंडेशनने एकत्र येत लोकवर्गणी गोळा केली. यावेळी समाजातील काशिराम बोपचे,भुवन राऊत,दादुभाऊ बोपचे,ज्ञानेश्वर नागोशे,स्वभिमान बचत फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे, सचिव वाय.एफ.पटले,हिरालाल महाजन,प्रमानंद तिरेले, कमलेश पटले, गणपतीजी कावडे, विनोद जायसवाल, वामनराव गोलंगे, खेमराज बोपचे, गोपाल उके,जे जे पटले सर, छगनलाल धपाडे, हेमराज भोयर, तेजलाल कावडे,आर एफ पारधी सर,धु्र्वराज पटले,संजय पारधी,डि एफ पटले सर, कुंदन भोयर,भाऊलाल चौव्हाण,मुन्नालाल भोयर,नुतण सोनवाने,नाना भोयर,हरीलाल ठाकरे आदी सभासदांनी सहकार्य केले.