Home विदर्भ कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे निरंतर आरोग्य सेवा देणे हे माझे कर्तव्य

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे निरंतर आरोग्य सेवा देणे हे माझे कर्तव्य

0

नागपूर दि. 21:-जगात कोरोना या आजाराच्या माहामारी चे भयंकर संकटं कोसळले असताना आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी, नसेऀस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र लढा दिला. कित्येकांना कोरोना मध्ये आपले मौल्यवान जीवन गमवावे लागले. कोरोना काळात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांच्या कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सेलंन्स , डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांची उत्कृष्ट सेवेबद्दल “”कोरोना योद्धा ” 2020″या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षकदिनी प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वीही डॉ. रुडे यांना म. फुले जन आरोग्य, पंतप्रधान जन आरोग्य योजनेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली होती त्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनी गडचिरोली येथे कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा. येडरावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. रुडे म्हणाले की. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा करीत असतांना ” पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा, आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असतांना अनुभवांचे,आयुष्यात पलटणारी पानंही खूप काही शिकवून गेली ….जेव्हा मन कमकुवत असतं, तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन संतुलित असतं, म्हणून कोरोना काळात आलेल्या परिस्थितीला आव्हानात्मक पध्दतीने स्विकारुन, मन खंबीर करून आलेल्या परिस्थितीवर मात केली. सर्व खेळ मनाचा आहे, मन खंबीर बनवा. लक्ष” साध्य करण्यासाठी, केवळ चांगले विचार असून, उपयोग नाही…. तर त्या, विचारांना योग्य प्रवाहात आणणारी.. चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे. जिल्ह्यातील कोरोनाचे माहामारी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन, प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी.. परिचारिका, परिसेविका, अधिनस्त आंतररुग्ण कक्षसेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , परिचर , सफाई कामगार आणि जनता यांच्या मौलिक सहकार्य मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना माहामारी आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. जोपर्यंत मनात आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द ठेवली की यश मिळविता येते …..स्वातंत्र्य दिनी मला शासनाने दिलेल्या पुरस्काराच्या माध्यमातून आशिर्वादरूपी दिलेल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनतेंनी दिलेली मैत्री, प्रेम व एकमेकांच्या बद्दल आपुलकी सहकार्य असेच अखंड आयुष्यभर राहो. सर्वांचे मनापासून आभार मानले.
कोरोना माहामारी आजारामुळे आयुष्य जगण्यासाठी समोर उभी टाकलेली परिस्थिती बरचं काही शिकवून गेली…सुख माणसाच्या
अहंकाराची परीक्षा घेते,
तर दुःख माणसाच्या
धैर्याची परीक्षा घेते..दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो,
तोच माणूस जीवनात
नेहमी यशस्वी होतो. युध्दाचे वेळी झालेला “वार,”अणि जगताना होताना जबाबदारीचा “भार “जो पर्यंत पाठीवर येत नाही .तोपर्यंत लढण्याची अणि जगण्याची कला अवगत होत नाही. असेही आमच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे यांनी सांगितले.
यशस्वी व्हायचे असेल तर चेहऱ्यावर स्मितहास्य व शांतपणा…, स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी… व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी आवश्यक आहे मात्र काही बाबतीत कठोर आणि शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे.
“कठोर परिश्रम “अणि “आत्मविश्वास” ही असफलता नावाच्या आजारावर दोन औषधे आहेत. ती एक यशस्वी व्यक्ती बनवीतात.
दररोज आशेचा किरण मनी ठेवून आणि प्रयत्नांचे पंख लावून स्वत:ला उंच भरारी घेण्यास सज्ज झाले की..,, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की,आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो..आणि “रुबाब”हा विकत घेता येत नाही ,आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिध्द होतो. अशा सुंदर शब्दात मौलिक प्रतिक्रिया ” कोरोना योध्दा” पुरस्कारासाठी निवड प्रसंगी घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या.

Exit mobile version