Home विदर्भ कोरची -कुरखेडा महामार्गांवर मोठे-मोठे भगदाड

कोरची -कुरखेडा महामार्गांवर मोठे-मोठे भगदाड

0

कोरची-कुरखेडावरून कोरची मार्ग छत्तीसगडकडे जाणारा बनत आहे.यामुळे या महामार्गावरून मार्गक्रमण करतांना जीव धोक्यात घालूनच मार्गक्रमण करावे लागते.मात्र याकडे राष्ट्रीय सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून या विभागाचे संबंधित अधिकारी झोपलेत काय असा प्रश्न रहदारी करणाऱ्यानां पडला आहे. तसेच या रस्त्यावरूनच स्थानिक लोकप्रतीनिधी सुध्दा मार्गक्रमण करीत असतात तरी या बाबींकड़े दुर्लक्ष का?
या महामार्गावर छत्तीसगड मधील ओवरलोड वाहनांचा नेहमीच वर्दळ असते.यामुळे हा कोरचीघाट वरून महामार्ग पूर्णपणे उखडला असुन या मार्गावर मोठे-मोठे भगदाड पडलेले आहे.रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडले आहेत.व या खड्याचे रूपांतर पाऊसामुळे तलावात झाले असुन हा खड्या आहे की तलाव असा प्रश्न रहदाऱ्यानां पडला आहे.या मार्गावरून रहदारी करतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हा महामार्ग छत्तीसगडमधील रायपुर पर्यंत जातो.ट्रक व ट्रीप्पर कर वाचविण्यासाच्या उद्देशाने या मार्गावरून जात असताना मात्र गडचिरोली पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जातांना बसणाऱ्या झट्क्यामुळे कंबर मानेचा त्रास वाढला आहे.अनेकदा अपघात होऊन प्रवाशांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. खड्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे इंजिन रस्त्याला घासत असल्यामुळे पेट्रोल डिझेल टँक फुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या बाबींची दखल घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी अन्यथा एकाधि दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावे. अशी मागणी नागरिकातून केली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version