Home विदर्भ कास्ट्राईब कर्मचारी, शिक्षक व अधिकार्‍यांचा अर्धवार्षिक मेळावा

कास्ट्राईब कर्मचारी, शिक्षक व अधिकार्‍यांचा अर्धवार्षिक मेळावा

0

 गोंदिया-कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय सभा १९ ऑगस्टला आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासनिक होते. सभेत कास्ट्राईबच्या ध्येय धोरणावर व संघटन शक्ती वाढविण्यावर विस्तृत चर्चा झाली.
उदघाटक प्रवीण गजभिये, दीप प्रज्वलक हेमराज शहारे, प्रमुख अतिथी भरत वाघमारे, हितेंद्र रामटेके, किशोर डोंगरवार, राजेंद्र सांगोडे, राजेश साखरे, जितेंद्र बोरकर होते. यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिनेश अंबादे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सभेत मागासवगीर्यांचे पदोन्नती आरक्षण विरोधी ७/५/२0२१ शासन निर्णय रद्द करून पदोन्नती आरक्षण पूर्वरत लागू करणे, संघटन शक्ती वाढविणे, गोंदिया जिल्हा प्राथ. शिक्षक सह.पत संस्थेची होणारी निवडणूक स्वबळावर सर्व तेरा (१३) जागा लढण्याचा व पुढे होणारी ग्राहक ची निवडणूक लढण्याचा विषय एकमुखाने मंजूर करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी केले. संचालन राजेश गजभिये व आभार उत्क्रांत उके यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक संघटनेचे वीरेंद्र भोवते जिल्हा सरचिटणीस,रोशन गजभिये, संजय मेर्शाम, अनिल मेर्शाम, अजित रामटेके, यज्ञराज रामटेके, लोकेश राऊत, दीक्षांत धारगावे, संचित वाळवे, टी.पी.गेडाम, महासंघाचे सौ.नम्रता रंगारी, रितेश शहारे, अमित गडपायले, अजय शहारे, आशिष रंगारी, नरेश गोंडाणे, प्रकाश सांगोळे, एल.जी.शहारे, धर्मेंद्र शहारे, संजय भावे, प्रशांत बडोले यांच्यासह जिल्हा, तालुका पदाधिकारी, सभासद बंधू – भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version