कुर्‍हाडी-पिंडकेपार रस्त्याचे निकृष्ट बांधकाम; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

0
42

गोरेगाव, दि.27 : तालुक्यातील कु-हाड़ी-पिंडकेपार रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट व निम्न दर्ज्याचे आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करण्या-या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. सदर निकृष्ट बांधकाम करणा-या कत्रांटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या कार्यात सहकार्य करणा-या अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केली आहे.

या निकृष्ट बांधकामाविरोधात कारवाईसाठी २७ आगस्टला गोंदिया जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले जाईल. अशी माहिती पक्षाच्या गोंदिया जिल्हा कौंसिलचे सचिव मिलिंद गणवीर यांनी वरिष्ठांना दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वार्षिक नियोजनाअंतर्गत १५ आगस्ट २०२० ला गोरेगाव तालुक्यातील कु-हाड़ी-पिंडकेपार रस्ता बांधकामासाठी २५ लाख रूपये मंजूर करण्यात आले. हे बांधकाम जुलै २०२१ पर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

यात जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कंत्राटदाराने सदर रस्ता अंत्यत निकृष्ट दर्ज्याचे तयार केले आहे. एका महिन्यातच जागोजागी खड्डे पड़ले आहेत. हा रस्ता डाबंरीकरणाचा असून डांबराचा पत्ताच नाही. रस्त्याच्या कडेला मुरूम न टाकता मातीच टाकली आहे. या रस्ता बांधकामाची निष्पक्ष चौकशी होवून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केली आहे