कार्यालयात काम करीत असतांना ‘टिम वर्क’ म्हणून काम करावे- वंदना सवरंगपते

0
79

उपविभागीय अधिकारी कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

गोंदिया,दि.27 : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करीत असतांना एक ‘टिम वर्क’ म्हणून
काम करावे. आपण आपल्या कार्यालयात ‘टिम वर्क’ म्हणून काम केले तर कितीही कठीण काम असले तरी
त्या कामाचे सहज निराकरण करणे सोईचे होते. असे मत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी
व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते पुढे म्हणाल्या, शासनाने आपल्याला ज्या कामाची
जबाबदारी दिलेली आहे त्या कामाची जबाबदारी स्विकारुन आपण आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन
करावे असे त्यांनी सांगितले.
नायब तहसिलदार जी.पी.सिंगाडे यावेळी म्हणाले, कार्यालयीन कामकाज आणि कामकाजाचे कामाशी
नाते हा कर्मचाऱ्यांच्या कर्तुत्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपविलेली कामे
प्रामाणिकपणे पूर्ण करावी. आपल्या कामाची दुसऱ्याच्या कामाशी तुलना न करता आपल्याकडे जी कामे
आहेत ती कामे कर्तव्यनिष्ठ पूर्ण करुन आपण आनंदीत राहावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
नायब तहसिलदार जी.पी.सिंगाडे, मंडळ अधिकारी डी.एच.पोरचेट्टीवार, मंडळ अधिकारी
बी.डी.भेंडारकर व अव्वल कारकून आशिष रामटेके यांची नियमीत बदल्या अंतर्गत गोंदिया तालुक्यातून
इतरत्र तालुक्यात बदली झाल्यामुळे निरोप समारंभ कार्यक्रम उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते
यांच्या अध्यक्षतेखाली 26 ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडला.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार आदेश डफळ, अप्पर तहसिलदार
अनिल खडतकर, नायब तहसिलदार आर.एन.पालांदूरकर, नायब तहसिलदार सीमा पाटणे, उपविभागातील
सर्व मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, सर्व तलाठी, महसूल सहाय्यक, कोतवाल, शिपाई, ऑपरेटर उपस्थित
होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी सर्वश्री डी.आर.भोयर, रियाज तुरकर, श्री हटवार, श्री
शिवणकर, दिवाकर गोले, जी.पी.सोनवाने, अव्वल कारकून सारीका बन्सोड, ए.पी.घडोले, मुकूल तिवारी व
कोतवाल बी.आर.पारधी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महसूल सहाय्यक अनुप मेश्राम यांनी
केले तर उपस्थितांचे आभार पुरवठा निरीक्षक वैभव तोंडे यांनी मानले.