तिरोडा,दि.27ः-तिरोडा तालुक्यातील मेंढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित पक्ष बैठकीत गावातील युवकांनी राज ठाकरेंच्या विचारावर विश्वास ठेऊन जिल्हाध्यक्ष हेमंतभाऊ लिल्हारेच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला.यावेळी प्रामुख्याने उपस्थिती उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे,शहर अध्यक्ष नागोशे,चक्रधर कावळे,रंजित मेश्राम उपस्थित होते.
यावेळी पक्षाच्या विचारधारेवर काम करण्यावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी पक्ष प्रवेश करणार्या युवकांमध्ये सतिश पटले,लंकेश मेश्राम, गौरव सुर्यवंशी, रोहित सुर्यवंशी,संदिप कावळे, चिराग बिसेन, पंकज बिसेन,मोहीत रिनाईत, प्रणय घोडेस्वार,कुवर चोभरे, अविणास मेश्राम, प्रकाश राऊत,राकेश पटले, देवेंद्र सुरसाऊत, राकेश भैरम ,ओंकार बिसेन,हितेश भैरम,विलास पटले यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कार्तिक अनकर यांनी तर आभार लोकेश उदापुरे यांनी मानले.