महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 453 अंतर्गत स्वच्छता विषयक तरतुदी मधील प्रकरण 14 मधील कलम 22 अंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात येत आहे. शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे मोकाट फिरत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणत आहेत. मोकाट डुकरे शहरातील रस्त्यावर कुठेही मलमूत्र विसर्जन करून साथरोग प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मनपाने तातडीने कारवाई सुरु केली आहे. शहरांमध्ये अनेकांनी बेकायदेशीररित्या वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी आपली डुकरे निर्जनस्थळी, वस्तीविरहित ठिकाणी बंदिस्त करून ठेवावेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट डुकरे फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मोकाट डुकरे फिरणार नाही, याची विशेष काळजी वराहपालन व्यावसायिकांनी स्वतः घ्यावी अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, ही कारवाई तीन दिवसाच्या आत करून आपल्या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त पालीवाल यांनी दिल्या आहेत.
चंद्रपूर, ता. २७ : शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मलमुत्र विर्सजन करुन अस्वच्छता करीत आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दररोज शहरात गस्त घालून मोकाट जनावरांवर कार्यवाही करावी, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्यात.
शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या बाबत अनेक नागरिक आणि नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानी दररोज शहरात गस्त घालून मोकाट जनावरा बाबत कार्यवाही करावी, शहरामध्ये कुठेही मोकाट जनावरे आढळून येणार नाही, याबाबत संपुर्ण कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिले.