Home विदर्भ आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध

आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध

0

गोंदिया-केंद्र शासनाने पारीत केल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. शांतप्रिय आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम पोलिस करीत आहेत. नुकतेच आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेचा राज्य किसान सभेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पोलिस अधिकारी सिन्हा यांच्यावर बळतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने पारीत केलेले तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. ते कायदे मागे घेण्यात यावे, यासाठी दिल्ला राज्यासह अनेक राज्यामध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. २८ ऑगस्ट रोजी हरियाणा राज्यातील करनाल शहरात शेतकर्‍यांनी केलेल्या शांतीपूर्ण रस्ता रोको आंदोलन दरम्यान शेतकर्‍यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. हा अमानुष हल्ला असून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान या प्रकरणात पोलिस अधिकारी यांच्यावर बळतर्फ कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी ते तीन कायदे मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा किसान सभेच्या वतीने देण्यात आले. यावेळी हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, प्रल्हाद उके, घनश्याम गजभिये, दिनेश रामटेकेआदी शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version