जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळा उभारणीला मनपाची मंजुरी

0
22
चंद्रपूर, ता. 2 : जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता शासकीय जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आता पुतळा उभारणीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आमसभेत मंजुरी देण्यात आली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात ३१ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती.
जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासह पुतळा उभारणीसाठी ठराव घेण्यात यावा, अशी मागणी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविका शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, माया उईके यांनी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्याकडे केली होती. यापूर्वी मनपाने चंद्रपूर शहरातील मोहल्ला जटपूरा -१, शिट नं, २३, नगर भूमापन क्र. २३३६पैकी (मालमत्ता पत्रकानुसार) क्षेत्र ५४.०० चौ.मी. भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शासकीय जागा सौंदर्यीकरण, देखभाल करण्यासाठी विनामुल्य महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन देण्याबाबत प्रस्ताव विहीत नमुन्यातील प्रपत्र भाग ‘अ’, ‘ब’ ‘क’, ‘स’मध्ये मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे या कार्यालयाचे पत्र क्र. चंशमनम / नर / ३१२७ / २०२१, दिनांक १९/०३ /२०२१ अन्वये सादर केला होता. सदर जागेवर सौंदर्यीकरण प्रस्तावित करणे व त्याकरीता आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सदर विषय मागील  २३ जून २०२१च्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यावेळी सौंदर्यीकरण करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. आता ३१ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत पुतळा उभारणीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.