वारकरी कलावंताना आर्थिक मदत द्या- लायकराम भेंडारकर

0
23

अर्जुनी मोर.दि.02 :- गोंदिया जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकार,प्रवचनकार, गायक,वादक,टाळकरी अशा विविध कलावंताना शासनाने त्वरीत आर्थिक मदत करावी असी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री यांचे नावे असलेले निवेदन आज ( ता.2 ) तहसिलदार अर्जुनी मोर. यांना देण्यात आले.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार देशात गेल्या दिड वर्षापासून कोरोणा महामारी चे संकट ओढावले आहे. देशात सततच्या लाॅकडाऊन मुळे शेतकरी, शेतमजुर, लहान उद्योग धंदेवाले तसेच कलाकारीवरच उदरनिर्वाह असणा-या कलावंतावर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. लाकडाऊन मुळे समाजातील सर्वच घटकातील लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा फटका वारकरी संप्रदायातील विवीध कलावंतानाही बसला आहे.वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम ,अखंड हरिणाम सप्ताह,पारायण सोहळे प्रदिर्घ काळापासून बंद असल्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार कलावंताना आर्थिक मदत द्यावी देण्यात यावी असी मागणी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी वारकरी साहित्य परिषदेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मोरेश्वर मेश्राम, योगेश शिवनकर, पुंडलिक बारशे महाराज, मोतीराम भेंडारकर महाराज, एकनाथ ठलाल महाराज, केशव फुंडे महाराज,प्रामुख्याने उपस्थित होते.