कंत्राटी नर्सेसच्या पुनर्नियुक्तीसाठी कलेक्टर समोर ताटी-वाटी ठोको आंदोलन

0
60
भंडारा -: कोरोना महामारी च्या भयंकर कठीण काळात जीवाची पर्वा न करता कोरूना पॉझिटिव रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी नर्सेसना पुनर्नियुक्ती, नवीन भरती व रिक्त जागेवर कंत्राटी नर्सेसची थेट नियुक्ती, व एएनएम ला प्राधान्य तसेच नियुक्त होत पर्यंत बेरोजगारी भत्ता इत्यादी मागण्यांसाठी कलेक्टर कचेरी समोर कंत्राटी नर्सेसचा आज दि.3 सप्टेंबर 021 ला ताटी-वाटी ठोको आंदोलन करण्यात आले.
     आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व आयटक चे जिल्हा  सचिव कॉम्रेड हिवराज उके , लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम व कंत्राटी नर्सेस मनीषा तीतिरमारे यांनी केले.
       कंत्राटी नर्सेसना तीन महिन्याच्या सेवेनंतर 13 जुलै पासून कामावरून कमी करण्यात आले. तेव्हापासून मंत्र्यांपासून आमदार, खासदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊनही काहीच उपयोग झाला नाही. साधे पाठपुराव्याची पत्रही देऊ शकले नाही. म्हणून दिनांक 25 ऑगस्ट पासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाचा आज दहावा  दिवस होऊनही संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याचे बघून आज दिनांक 3 सप्टेंबरला शासन प्रशासनाचे आंदोलनाकडे व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ताटी- वाटी ठोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर लगेच मा. जिल्हाधिकारी संदीप कदम यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली त्यात त्यांनी तुमच्या मागण्यांचा  शासनाकडे लगेच पाठपुरावा करतो व तसे तुम्हास पत्र देतो, तुम्ही आंदोलन मागे घ्या असे ते म्हणाले.
         जोपर्यंत शासन प्रशासनाची भूमिका स्पष्ट होत नाही व तसे लिखित जिल्हाधिकार्‍यांचे पत्र मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन चालू राहील. तसेच यापुढे जन प्रतिनिधींनी आंदोलना ची दखल घेऊन मंत्र्यांसोबत बैठक फिक्स करावी व समस्येचे समाधान करावे अन्यथा त्याच्या  विरूद्ध आंदोलन करण्यात येईल असे आवाहन काॅ. हिवराज उके जिल्हा सचिव भाकप व आयटक  यांनी केले.  शिष्टमंडळात व आंदोलनात काॅ. हिवराज उके,अचल मेश्राम, मनीषा तीतिरमारे, नंदा कोसरकर, सुभांगी रवरोले, ऋतुजा साठवणे,साधना आगाशे, सीमा चौधरी, पवित्रा मेश्राम माधुरी पवार ए माया बिसणे, रिता मेश्राम ,ज्योती कोडवते तसेच काॅ. वाल्मीक नागपुरे, गणेश चिचामे ,रत्नाकर मारवाडे, प्रकाश उईकेे  इत्यादींचा समावेश होता.