सेजगाव येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपूजन

0
21

तिरोडा : तालुक्यातील सेजगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन ४ सप्टेंबर रोजी आ.विजय रहांगडाले आमदार यांच्या करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच के.के. पारधी, माजी उपसभापती किशोरजी पारधी, उपसरपंच स्वप्निल महाजन, जि.प.चे माजी सभापती मदनभाऊ पटले, भाजयुमोचे उपाध्यक्ष गौरीशंकर पारधी, ग्रा.पं.सदस्य मनीषा बावनकर, ग्रामसेवक डी.आर.तुरकर, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक सुरज पारधी, डॉ. बसंत भगत, पवण पटले, राधेकिशन शरणागत, अ‍ॅड.युसुफ शेख, नेतलाल मालाधारी, गिरजाशंकर बिसेन सर्व ग्राम पंचायत सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी सेजगाव येथील नागरिक उपस्थित होते.